Accident
sakal
विदर्भ
Dhamana Accident : ब्रेक फेल झालेल्या ट्रकने दोन मजुरांना चिरडले; दोघांचाही मृत्यू
ब्रेक फेल झालेल्या अनियंत्रित ट्रकखाली येऊन दोन बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
धामणा (लिंगा) - नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गालगत बाजारगावजवळील सावंगा (शिवा) येथील इकॉनॉमिक्स एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या परिसरात शुक्रवारी (ता.९) सकाळी ११ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. ब्रेक फेल झालेल्या अनियंत्रित ट्रकखाली येऊन दोन बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात खळबळ उडाली.
