साडेअकराशे लाचखोरांना ठोकल्‍या बेड्या!

श्रीधर ढगे
Tuesday, 10 December 2019

समाजाला भ्रष्टाचाराच्‍या विळख्यातून मुक्‍त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या वतिने राज्‍यभर लाचखोरांच्‍या विरोधात धडक मोहीम राबवली. राज्‍यात एकूण मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरगांबाद, नांदेड या विभागाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी केलेल्‍या तक्रारीवरुन 795 सापळे रचून लाचखोरांना बेड्या ठोकण्यात आल्‍या.

खामगाव (जिल्हा बुलडाणा)  : गत वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडून सापळे रचून ११४१ लाचखोरांना बेड्या ठोकल्‍या आहेत. त्‍यांच्‍यावर गुन्‍हे नोंदवून न्‍यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत नऊ प्रकरणांमध्ये दहा आरोपींना शिक्षा ठोठावली गेली असून एक लाखावर दंड आकारण्यात आला आहे. 

समाजाला भ्रष्टाचाराच्‍या विळख्यातून मुक्‍त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या वतिने राज्‍यभर लाचखोरांच्‍या विरोधात धडक मोहीम राबवली. राज्‍यात एकूण मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरगांबाद, नांदेड या विभागाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी केलेल्‍या तक्रारीवरुन 795 सापळे रचून लाचखोरांना बेड्या ठोकण्यात आल्‍या. असंपदा बाळगणाऱ्या 18 जणांवर कारवाई केल्‍या गेली तर भ्रष्टाचाराच्‍या पाच तक्रारीवरुन गुन्‍हे दाखल करण्यात आले. 

हेही वाचा -  अहो आश्चर्यम...माहिती द्या; नाहीतर तीन लाख खंडणी द्या!

वर्षभरात राज्‍यात एकूण 1149 लाचखोरांवर कारवाई झाली आहे. ही प्रकरणे न्‍यायप्रविष्ठ असून 9 प्रकरणांमध्ये न्‍यायालयात आरोप सिध्द झाले. त्‍याअंतर्गत दहा जणांना शिक्षा ठोठावून त्‍यांच्‍याकडून 1 लाख 1 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनातील लाचखोरीला आळा बसावा, म्हणून शासनाने प्रत्येक राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत केला. केंद्रीय पातळीवर दक्षता आयोगही स्थापन केला. पण, लाचखोरी कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. त्‍यामुळे नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या वतीने करण्यात आले आहे.

काय आहे या लिंकमध्ये? - कॉँग्रेस, शिवसेनेची स्वबळाची तयारी
लाच देण्याऐवजी लाच मागणाऱ्यांची तक्रार करा
लाचलुचपत विभागामार्फत दरवर्षी 31 ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह राबवला जातो. विविध माध्यमातून ही जनजागृती करण्यात येते. नागरिकांनी लाच देण्याऐवजी कोणतीही भिती न बाळगता लाचखोरांच्या विरोधात तक्रार देणे आवश्यक आहे. लाच घेणारा व देणाराही दोषी असतो. त्यासाठीच नागरिकांनी लाच देण्याऐवजी लाच मागणाऱ्यांची आमच्याकडे तक्रार करावी, तर लाचखोरांना आळा बसेल.
-शैलेश जाधव, पोलिस उपअधीक्षक

विभाग निहाय कारवाई
विभाग     गुन्‍हे       आरोपी
मुंबई            37      53
ठाणे            97     144
पुणे            167     231
नाशिक       117     162
 नगापूर      104     133
अमरावती  104      146
औरंगाबाद  117      169
नांदेड         75       102
एकुण        818     1141
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bribe-hit in the Maharashtra