दारूविक्रेत्याकडून घेतली पोलिसाने लाच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

चंद्रपूर : दारूची वाहतूक आणि विक्री सुरू ठेवण्यासाठी विक्रेत्याकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना पडोली येथील एका पोलिस कर्मचाऱ्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली. गणेश जोगंदड (वय 30) असे लाच घेणाऱ्या पोलिसाचे नाव आहे.

येथील रयतवारी कॉलरी परिसरात दारू विक्री करणाऱ्या तक्रारदाराचे वास्तव्य आहे. काही महिन्यांपासून तो दारूविक्री करीत आहे. पडोली पोलिस ठाण्यातील कर्मचारी गणेश जोगंदड याने तक्रारदाराला दारूची वाहतूक आणि विक्री सुरू ठेवल्यानंतरही कोणतीच कारवाई न करण्यासाठी प्रती महिना दहा हजार रुपयांची लाच मागितली. पोलिसाची मागणी अमान्य करीत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. सहा सप्टेंबर रोजी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. मात्र, जोगंदड याने फोन केल्यानंतर रक्कम आणून देण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी तक्रारदाराला पोलिसाचा फोन आला. त्याने विश्रामगृहाजवळील दर्गा परिसरात पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bribe taken by policeman from a wine seller