
अर्चना फाटे
मोताळा : दहशत, भेदभाव आणि तणावाच्या सावटाखाली अडकलेल्या आजच्या या वातावरणात जर एखादी गोष्ट समाजाला सावरू शकते, तर ती आहे माणुसकी आणि प्रेम. काश्मीरमधील पहलगाव येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संताप आहे, शोक आहे. या पार्श्वभूमीवर दोन मित्रांची कथा हृदयाला स्पर्श करून जाते आणि माणुसकी शिल्लक आहे, हे सांगते.