ब्रिटीशकालीन इमारतींना अखेरची घरघर

मुकुंद कोरडे
गुरुवार, 29 मार्च 2018

निवासस्थानाजवळ शाळा हवी
अनेकदा पाेलिस कर्मचाऱ्यांची ड्युटी बाहेरगावी लागते. ते घराकडे लक्ष देऊ शकत नाही. पाल्यांची शाळा लांब असल्याने त्यांना ने आण करण्याची समस्या असते. अशावेळी पाेलिसांच्या पाल्यांसाठी निवासस्थानाजवळच स्वतंत्र शाळेची निर्मिती करणे गरजेचे आहे.

अकोला : अकोट येथील पाेलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना अवकळा आली आहे. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पाेलिस कर्मचाऱ्यांनाच जर निवाऱ्याची व्यवस्था नसले तर त्यांची काम करण्याची मानसिकता कशी कायम राहिल असाही प्रश्न उपस्थित आहे. अनेक निवासस्थानांचे बांधकाम ब्रिटीशकाळात झाले असल्याने त्यांना अखेरची घरघर लागली आहे.

वर्षानुवर्षानंतरही या निवासस्थानांची दुरुस्ती, नियमीत रंगरंगाेटी करण्यात न आल्याने पाेलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जीव धाेक्यात घालूनच राहावे लागत आहे. येथील पाेलिस ठाण्यात पाच अधिकाऱ्यांसह ८० कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांसाठी ५१ निवासस्थाने बांधली आहेत. ब्रिटीशकाळात बांधकाम झाले असल्याने या इमारती जीर्ण झाल्या आहेत. परिसरात झाडे झुडपे तसेच वातावरण अस्वच्छ असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

राहण्याच्या दृष्टीने पुरेशी जागा नसल्याने अनेक कर्मचारी भाड्याच्या खाेलीत राहतात. या निवासस्थानांची दुरुस्ती केली तरी तात्पुरता, त्यानंतर परिस्थिती जैसे थे हाेते. या निवासस्थानातील छते पावसामुळे जीर्ण झाले असून कधी खाली येतील ते सांगता येत नाही. जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पाेलिसांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे.

निवासस्थानाजवळ शाळा हवी
अनेकदा पाेलिस कर्मचाऱ्यांची ड्युटी बाहेरगावी लागते. ते घराकडे लक्ष देऊ शकत नाही. पाल्यांची शाळा लांब असल्याने त्यांना ने आण करण्याची समस्या असते. अशावेळी पाेलिसांच्या पाल्यांसाठी निवासस्थानाजवळच स्वतंत्र शाळेची निर्मिती करणे गरजेचे आहे.

उद्यानाची निर्मिती करावी
पाेलिसांच्या निवासस्थान परिसरात भव्य उद्यानाची निर्मिती करणे आवश्यक आहे. प्रशस्त जागेत माेठमाेठे सावली देणारे वृक्ष लावल्यास त्यांच्या छायेत कर्मचाऱ्यांच्या माता पित्यांना उन्हाळ्यात वेळ घालवता येईल. लहान मुलांसाठी आकर्षक खेळणे लावल्यास त्याचाही बालकांना आनंद लुटता येईल.

पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करावी
येथील निवासस्थाने अत्यंत माेजक्या जागेत बांधली असल्याने वापर करण्यास जागा कमी पडते. तसेच सायकल, माेटारसायकल किंवा इतर वाहने ठेवण्यास पुरेशी जागा नसते. त्यामुळे घरी एखादा कार्यक्रम असला व शेकडाे लाेक आल्यास पार्किंग करण्याची पंचाईत हाेते. यासाठी भव्य जागेत वाहनतळ उभारण्याची गरज आहे.

कलागुणांना वाव द्यावा
पाेलिस कर्मचाऱ्यांमध्येही विविध कलागुण आहेत. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्वतंत्र हॉलची निर्मिती करून त्यामध्ये संगित, गायन, चित्रकला, वक्तृत्व, अभिनयाचे प्रशिक्षण देणारे वर्ग सुरू करावे.

Web Title: british era building in Akola