Crime News : रामटेकमध्ये पैशाच्या वादातून एकाची निघृण हत्या
Knife Attack : रामटेकमध्ये पैशाच्या वादातून दोन सख्या भावांनी हर्षल कोटांगळे याची धारदार शस्त्राने हत्या केली. घायाळ हर्षलचा मेयो रुग्णालयात नेण्याच्या दरम्यान मृत्यू झाला.
रामटेक : पैशाच्या वादावरून दोन सख्या भावांनी एकाची धारदार शस्त्राने निघृण हत्या केली. ही घटना गुरुवार (ता. १५) च्या रात्री अकरा ते साडेअकरा दरम्यान रामटेक-दुधाळा मार्गावरील नगर परिषदेच्या क्वार्टर मागील भागात घडली.