esakal | Video : बीएसएनएलचे कोसळले टॉवर आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

bsnl

सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळामुळे शहरातील आठवडी बाजाराशेजारी असलेले बीएसएनएलचे १०० मीटर उंचीचे टॉवर बाजारवाडीतील खुल्या जागेत कोसळल्याने मोठी प्राणहानी टळली असली तरी बीएसएनएलचे खूप मोठे नुकसान झाले आहे. टॉवर कोसळल्याचे समजताच बघ्यांनी एकच गर्दी केली.

Video : बीएसएनएलचे कोसळले टॉवर आणि...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरची (जि. गडचिरोली) : ऐन एप्रिलच्या उन्हाळ्यात पावसाने आणि वादशाने विदर्भाला झोडपले.
 सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात येथील बीएसएनएलचे १०० मीटर उंचीचे टॉवर कोसळले. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही
सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळामुळे शहरातील आठवडी बाजाराशेजारी असलेले बीएसएनएलचे १०० मीटर उंचीचे टॉवर बाजारवाडीतील खुल्या जागेत कोसळल्याने मोठी प्राणहानी टळली असली तरी बीएसएनएलचे खूप मोठे नुकसान झाले आहे. टॉवर कोसळल्याचे समजताच बघ्यांनी एकच गर्दी केली.

या टॉवरवरून तालुक्यातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँडचा पुरवठा करण्यात येत होता टॉवर कोसळल्याने कनेक्टिव्हिटी बंद झाली.

सविस्तर वाचा - माहिती लपवित असल्याने महापालिकेने उचलले कठोर पाऊल; तब्बल इतक्या नागरिकांसोबत करणार असं...
शहरातील बीएसएनएलच्या टॉवर सोबतच विद्युततारा तुटल्याने विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून तो रात्री उशिरा पूर्ववत सुरू केला