गडकिल्ल्यांना धक्‍का न लावता विश्रामगृह उभारा : अभिनेते मिलिंद गुणाजी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नागपूर : विमानाने मुंबईत उतरलेला विदेशी पर्यटक मेळघाटात येत नाही. त्यांना ताडोब्याची ओढ नसते. चिखलदरा तर सोडाच; पण शिवकिल्ल्यांवरदेखील ते जात नाहीत. हे पर्यटक राजस्थान, गुजरातमध्ये आनंदाने जातात. त्याला कारण आहे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची दुर्दशा. गडकिल्ल्यांना हेरिटेज हॉटेल्स बनविण्याची काही गरज नाही. याउलट गडकिल्ल्यांना धक्‍का न लावता विश्रामगृह उभारण्याची गरज असल्याचे मत अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी व्यक्‍त केली.

एसजीआरकेएफच्या वतीने अभिनेते व पर्यटन लेखक मिलिंद गुणाजी यांच्या चर्चासत्राचे आयोजन सिव्हिल लाइन्स येथील चिटणीस सेंटर येथे करण्यात आले. यावेळी मिलिंद गुणाजी यांनी विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. श्‍वेता शेलगावकर यांनी मुलाखत घेतली.

महाराष्ट्राच्या कुशीत अनेक सुंदर पर्यटन स्थळे दडलेली असून, चित्रीकरणातून मिळणाऱ्या फावल्या वेळात पर्यटनस्थळी भेटी देतो आणि लिखाण करतो आहे. इतिहासाच्या खाणाखुणा शोधताना फार मजा येते. तेथे भेटी देताना अनेकदा चांगले-वाईट अनुभव आले असल्याचे गुणाजी यांनी सांगितले. प्रायोजकांच्या पैशावर संपूर्ण जग फिरलो; पण मला सर्वांत जास्त माथेरान आवडत असल्याचे मिलिंद गुणाजींनी सांगितले. महिन्यातून दोनदा तेथेच राहत असून, तिथली ओढ असते. सोशल मीडियाच्या आहारी न जाता, पर्यटन हाच छंद जोपासल्याचे गुणाजी म्हणाले.
चित्रपटांमध्ये अभिनय केले. लोक माझ्या नावाने नव्हे, तर चित्रपटातील भूमिकेवरून मला ओळखतात. भेटले की, उत्साहाने संवाद साधतात, फोटो काढतात अन्‌ सगळ्यांत शेवटी माझे खरे नाव काय, हेदेखील विचारत असल्याचे गुणाजी म्हणाले.

दक्षिणेतील लोकांमध्ये वक्तशीरपणा
दक्षिणेतील भाषा येत नसल्यातरी तिथल्या चित्रपटांत काम करण्याची संधी मिळालेल्या गुणाजींनी तेलुगू भाषेचे ज्ञान नसल्याचे सांगितले. मात्र, महाराष्ट्रापेक्षा दक्षिण सिनेसृष्टीतील लोकांमध्ये वक्तशीरपणा असल्याचे गुणाजींनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रेक्षकांच्या आग्रहाखात "रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ' सादर केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Build a restroom without hitting the stairs: Actor Milind Gunaji