
वर्धा : बाजारपेठेतील सराफा ओळीतील जीर्ण इमारत शनिवारी (ता. १५)मध्यरात्री काेसळली. रात्रीची वेळ असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र चारचाकी वाहनांचे यात नुकसान झाले. दरम्यान, इमारत पडली की पाडली, या चर्चेला रविवारी (ता. १६) उधाण आले हाेते. मात्र चार चाकी तसेच काही हातगाड्या त्यात दबल्याचे सांगण्यात येते.