बुलडाणा : खारपान पट्ट्यात बिघडले शेतीचे तंत्र

शासनाने प्रायोगिक स्वरूपाचे नावीन्य पूर्ण प्रकल्प राबवण्याची गरज
Buldana farming
Buldana farming

संग्रामपूर - खारपान पट्ट्यातील वर्षाकाठी बिघडलेले उत्पादनाचे आणि उत्पन्नाचे तंत्र पाहता मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना शेतीतून समृद्धीची दिशा दर्शकची गरज वाटू लागली आहे. यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागानें पुढाकार घेऊन प्रायोगिक स्वरूपाचे नावीन्य पूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेणे काळानुसार महत्वाचे बनले आहे. यातून शेतकऱ्यांना सतत मासिक उत्पादन देणारी पगारी शेती हा प्रकल्प समोर येत आहे.

विदर्भातील सिंचनाचा अनुशेष आणि विदर्भातील विकास विरोधी नेत्यांनी आतापर्यंत शेतीला समृद्ध करण्यावर भर दिला नाही. यातूनच विदर्भात पगारी शेतीचा प्रयोग यापूर्वी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हाच प्रयोग खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी राबविल्यास आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार होऊ शकेल. त्यासाठी राज्य शासनाकडून अभियानाच्या धर्तीवर स्पर्धात्मक हा प्रयोग राबविण्याची गरज दिसत आहे. बारमाही पिकांच्या आणि निसर्गाच्या लहरिपणावर या भागातील शेती व्यवसाय वृंद्धीगत होण्याऐवजी उद्धवस्तच्या दिशेने जात आहे. म्हणूनच आतापर्यंत या भागातील आर्थिक स्तर उंचावण्यासाठी राबविलेल्या योजना आणि त्यातून निघालेले तात्पर्य चिंतनाचा विषय बनत आहे. पगारी शेती ही संकल्पना शासनाला खर्चिक नसून आर्थिक विकासाची वाट ठरणारी आहे.

शेती हा सगळ्यांचा चर्चेचा, आवडीचा, राजकारणाचा आणि जीवनमरणाचा विषय! प्रत्येक जण शेतीत कशी प्रगती करावी यावर घसा कोरडा होईपर्यत बोलत आहेत. या भागात आता पर्यत शेतीच्या विकासासाठी धडपड करण्यात आली आणि सुरूही आहे. पण या धडपडीतून किती शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले हे पाहणे ही अगत्याचे. शेती विकासातील अडथळ्यांचा कारणाचा शोध घेतला तर भली मोठी यादी तयार होईल. विविध कंपन्या आपले बियाणे व औषधे, खते, कसे चांगले याबाबत शेतकऱ्याच्या भावनांना आव्हान करून दरवर्षी वारेमाप खर्च करण्यास भाग पाडतात. त्यातून नफा तोट्याचे गणित मांडले तर निव्वळ नफा अंत्यत कमी उरतो. सर्व खर्च जाऊन उरणाऱ्या नफ्यातून शेतकऱ्यांना कुटूंबाचा आर्थिक व्यवहार चालविणे आणि आकस्मिक खर्च भागविणे अावश्यक होत आहे. म्हणूच आद्यपही शेतकरी कर्जाच्या चक्रातून बाहेर पडत नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही.

वृक्ष आहे शेतकऱ्यांची माऊली, देई फळ अन सावली!

निसर्गाने दान दिलेले ऋतुचक्र पाहता उपलब्ध तीन हंगाममध्ये येणारी विविध फळे पाहता प्रत्येक महिन्यात पगारा सारखी रक्कम उपलब्ध होऊ शकेल. त्या साठी मनाची तयारी नवीन काही तरी करण्याची उमेद प्रयोगशीलता याची सांगड घातल्यास अडचणीच्या वेळी आर्थिक उत्पप्नाचा हा मार्ग निश्चितच उपयोगात येईल. प्रत्येक महिन्यात निसर्गाने उपलब्ध करून दिलेले फळझाडाची ४ ते ५ वर्ष काळजी घेतल्यास ३० ते ४० वर्षे शेतकऱ्याचा आर्थिक आधार बनण्यास तयार आहेत. पगारी शेतीचा उपयोग केवळ शेतकऱ्यांनाच होणार असे नाही तर नैसर्गिक संतुलन राखणे वेगवेगळ्या हंगामात पशु पक्षी यांनाही खाद्य उपलब्ध होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com