बुलडाणा : विवाहितेला खोलीत कोंडून सोडले साप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

बुलडाणा : विवाहितेला खोलीत कोंडून सोडले साप

बुलडाणा : पैशांची मागणी करत सासरच्या मंडळीकडून सातत्याने छळ करत गेल्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस खोली कोंडून ठेवण्यात आले. इतकेच नव्हे तर विवाहिता घाबरली पाहिजे, घर सोडून गेली पाहिजे यासाठी तिच्या खोलीत दोन सापाचे पिल्ले सोडण्यात आली. याबाबत ६ सप्टेंबरला विवाहितेने बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून अकोला येथील सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी येथे माहेर असलेल्या मनीषा कमलेश लाड (वय ३६) यांनी दिलेल्या तक्रारी, २०१९ मध्ये अकोला येथील मोठी उमरी परिसरात राहणाऱ्या कमलेश लाड यासोबत लग्न झाले. लग्नानंतर लगेच हुंड्यासाठी मनीषा यांचा छळ करुण्यात आला. तुझ्या बापाकडे भरपूर शेती आहे. २-३ एकर माझ्या नावावर करायला लाव असा तगादा नवरा तिच्याभोवती लावत आहे. पाच लाख हुंडा व १० तोळे सोने घेऊन ये तरच मी तुला वागविणार असे म्हणत नवरा तिला मारहाण करून लागला.

दरम्यान, २०१९ च्या नवरात्री दरम्यान, सासरच्या मंडळींनी मनिषाला एका खोलीत कोंडून ठेवले व त्या खोलीत दोन सापाचे पिल्ले आणून सोडल्याचा आरोप मनिषाने तक्रारीत केला आहे.

दरम्यान, लग्नानंतर महिन्यातरच ४ जानेवारी २०२० ला मनिषाला नवरा व सासरच्यांनी घराबाहेर काढून दिले. त्याआधी तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले. तेव्हापासून ती बुलडाणा येथे माहेरी येथे राहत आहे. अनेकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न होऊनही तिचा नवरा तिला नांदायला तयार नसल्याने तिने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी नवरा कमलेश लाड याच्यासह सासू, सासरे, दीर, नणंद अशा पाच व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Buldana Snake Left Married Man Locked Room

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..