

Buldhana
esakal
बुलडाणा: जून महिन्याचा पहिला आठवडा संपताच शेतकरी खरीप हंगामातील पीक पेरणीच्या कामाला वेग देणार असून, त्या दृष्टीने शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात सद्या व्यस्त दिसत आहेत. शेतकऱ्यांना खरीप हंगामात बी-बियाणे व खतांची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यात ७ लाख ३८ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे.