

Maharashtra-Rajasthan Shepherds Clash Over Fodder Shortage in Buldhana, Tension Escalates
esakal
महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील चारा उपलब्धता कायम ठेवण्यासाठी इतर राज्यांतील आणि जिल्ह्यांतील मेंढपाळांच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. या निर्णयामुळे मात्र आता महाराष्ट्र आणि राजस्थानमधील मेंढपाळांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे.