संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे

संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे

डॉ. रूपाली कलाने; जागतीक अंडी दिन

शेगाव (बूलडाणा): अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे व जीवनसत्वे असतात, त्यामूऴे संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हाच मंत्र आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे मत डॉ. रूपाली कलाने यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या पशूसंवर्धन विभागामार्फत अंडी खाण्याबाबत जनजागृतू केली जात आहे. या ऊपक्रमाअंतर्गत शेगाव पंचायत समितीच्या पशूधन विभागाच्या वतीने तालूक्यातील सगोडा पशूचिकित्सालया अंतर्गत असलेल्या भोनगाव येथे अंगनवाडीत अंडी वाटपाचा कार्यक्रम झाला. सगोडा येथील प्रभारी पशूधन विकास अधिकारी डॉ. रूपाली कलाने यांनी मार्गदर्शन केले. 13 ऑक्टोबर हा दिवस जागतीक अंडी दिन म्हणून साजरा केल्या जातो. शरीराची झिज होताना येणारा ताणतणाव कमी करण्यासाठी अंडयातील सेलीनियम हे सुक्ष्म पोषक मुलद्रव्य उपयोगी आहे. अंडयात असलेल्या ल्युटिन आणि झेक्सेथिंग या घटकामुळे वयोमानामुळे होणारी डोळयाची झिज रोखू शकते. निरोगी केसांची वाढ व नखांसाठी आवश्यक घटक अंडयात आहेत. सल्फर, जीवनसत्वे, मुलद्रव्ये हे केस निरोगी राखतात. अल्ट्राव्हायलेट किरणाने होणारे डोळयाचे दृष्परीणाम प्रतिबंध करते. वयपरत्वे होणारा मोतीबिंदुसारखा दृष्टिदोषाची जोखीम कमी करण्यास मदत होते. प्रोस्टेड ग्रंथीची वाढ, गाठ निर्माण होऊ नये, कर्करोग यास प्रतिबंध करणारे सेलेनियम हे घटकद्रव्य अंडयामध्ये आढळते. मुडदुस, अल्झायमर, हाडाची ठिसुळता आणि दोन प्रकारचे मधुमेह याची जोखीम अंडयातील कोलीन या घटकामुळे कमी होते. रक्तात होणा-या गाठी आणि हृदयविकार याची जोखीम कमी करणारे घटक अंडयात आहेत.

ताजी अंडी व शिळी अंडी पाण्यात सहज ओळखू येतात. पातेल्यातील पाण्यात आडवी झाले तर ताजे आहे, उभे राहिले तर कमी ताजे आहे व तरंगु लागले तर नकी शिळे आहे. ते खाऊ नये. फार कोरडी नाही अशा जागेवर अंडी रुंद भाग जमीनीकडे करुन ठेवावेत अंडी फ्रिजमध्ये असल्यास खाद्य पदार्थ करण्यापूर्वी गरम पाणी ओतावे. अंडी मंद अग्नीवर शिजवावा. अंडी भाडयामध्ये पाण्यात ठेवा आणि उकडा नंतर आग कमी करुन दहा मिनिटे ठेवा अंडी उकडल्यानंतर ती अंडी थंड पाण्यात बुडवा आणि झपाटयाने थंड होऊ द्या असे केल्याने अंडयाचा पिवळा व पांढरा भाग यांच्या दरम्यान काळसर वर्तूळ येत नाही, अशी माहीतीही डॉ. कलाने यांनी दिली. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अंडी खाण्याबाबत जनजागृती केली जात आहे. काही योजनेतून अंडी उत्पादक लघू उदयोगासाठीही प्रोत्साहन देण्यात येत आहे. या वेळी अंगनवाडी सेविका व पशूधन कर्मचारी उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com