Agri Solar Pump
PM Kusum Scheme Solar Pumpsesakal

Agri Solar Pump : जिल्ह्यातील शेतीला मिळाली शाश्वत सिंचन सुविधा; साडेसात हजार शेतकऱ्यांना लाभ, सौर कृषीपंप आणि पीएम कुसूम योजना

Solar Success Story : बुलडाणा जिल्ह्यात 'मागेल त्याला सौर कृषीपंप' व 'पीएम कुसुम' योजनांच्या माध्यमातून ७,६५० शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा मिळाली आहे. जिल्ह्यातील २९ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, सौरऊर्जेचा शेतीसाठी मोठा लाभ होत आहे.
Published on

बुलडाणा : मागेल त्याला सौर कृषीपंप आणि पीएम कुसूम योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतांमध्ये शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध होत आहे. आतापर्यंत मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेसाठी जिल्ह्यातील ३ हजार ५५६ शेतकऱ्यांनी एजन्सीची निवड केली असून आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांचा शेतात सौर कृषीपंप बसविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात पी.एम. कुसूम योजनेच्या माध्यमातूनही ७ हजार १५० शेतकरयांच्या शेतात सौर कृषीपंप बसविण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com