esakal | Video:जगासह भारत नैसर्गिक संकटात, भेंडवळच्या घटमांडणीचे भाकित, मांडणीला तीनशे वर्षांची परंपरा

बोलून बातमी शोधा

Buldhana prediction bhendwad formation country will find itself big natural disaster

दरवर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी भेंडवळ  गावातील मारुतीच्या पारावर मांडणी करण्यात येते. त्या मांडणीचे निरीक्षण करून नोंदी घेण्यात येतात आखाजीच्या दिवशी सायंकाळी केलेली मांडणीचे दुसऱ्या दिवशी पहाटे अवलोकन करून नोंदी घेण्यात येतात मांडणीच्या नोंदी आणि आखाजीच्या मांडणीच्या नोंदीचा मेळ आणून योग्य समन्वयाच्या आधारे भाकित वर्तवण्यात येते.

Video:जगासह भारत नैसर्गिक संकटात, भेंडवळच्या घटमांडणीचे भाकित, मांडणीला तीनशे वर्षांची परंपरा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव जामोद (जि.बुलडाणा):  भेंडवळ बुद्रुक येथील साडेतीनशे वर्षापूर्वी चंद्रभान महाराजांनी केलेली घटमांडणी व भाकीत वर्तविण्याची परंपरा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडित होते की काय याची भीती असतानाच कोणताही गाजावाजा व गवगवा न करता पुंजाजी महाराज आणि सहकाऱ्यांनी भेंडवळची घटमांडणीची साडेतीनशे वर्षाची अविरत परंपरा खंडित ठेवली. त्यामुळे सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.


दरवर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी भेंडवळ  गावातील मारुतीच्या पारावर मांडणी करण्यात येते. त्या मांडणीचे निरीक्षण करून नोंदी घेण्यात येतात आखाजीच्या दिवशी सायंकाळी केलेली मांडणीचे दुसऱ्या दिवशी पहाटे अवलोकन करून नोंदी घेण्यात येतात मांडणीच्या नोंदी आणि आखाजीच्या मांडणीच्या नोंदीचा मेळ आणून योग्य समन्वयाच्या आधारे भाकित वर्तवण्यात येते.

अक्षय तृतीयेला (ता.२६) सायंकाळी घट मांडण्यात आला. २७ एप्रिल रोजी पहाटे पुंजाजी महाराज आणि सारंगधर वाघ यांनी गटाचे निरीक्षण करून नोंदी घेत या वर्षीची भविष्यवाणी वर्तविली. या मांडणीसाठी कुणालाही पूर्वकल्पना न देता फक्त पुंजाजी महाराज व सारंगधर महाराजांनी घटात जाऊन अवलोकन करीत सोशल डिस्टंन्सिंगची मर्यादा पाळली. या मांडणीला बाहेरगावाहून कुणालाही परवानगी देण्यात आली नव्हती. मांडणी रद्दच आहे. त्यामुळे भेंडवळला कोणी येण्याचा प्रयत्नही केला नाही.

यावर्षी असा असेल पाऊस
करव्यामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे यावर्षी पावसाळा चांगला होईल असा अंदाज वर्तविण्यात आला. पहिल्या जून महिन्यात साधारण पाऊस तर जुलै महिन्यात चांगला पाऊस आणि ऑगस्ट महिन्यात थोडा कमी पावसाळा होईल. तसेच शेवटच्या सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस आल्यामुळे पूरपरिस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो आणि काही पिकांची सार्वत्रिक नासाडी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही,असे भाकीत यावेळी पुंजाजी महाराजांचे सहकारी सारंगधर वाघ यांनी केले आहे.

वार्षिक पीक परिस्थितीचे भाकीत
परिसरातील शेतकरी साडेतीनशे वर्षापासून ह्या भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज घेऊन पिकांची पेरणी करत असतात. या वर्षी सुद्धा ह्या घटमांडणी पुंजाजी महाराजांनी पीक पाण्याचे भाकीत वर्तविले. 

तूर चांगले पीक
या वर्षात तूर हे सर्वात चांगले येणारे पीक असेल तर कपाशीचे पीक हे कुठे कमी कुठे अधिक सर्वसाधारण राहील. अतिवृष्टी आणि जास्त पावसामुळे ज्वारीचे पीक साधारण असून या पिकांची नासधूस होण्याची शक्यता जास्त आहे. 

मुग साधारण
मुगाचे पीक सुद्धा साधारण असून उडदाचे पीक साधारण राहील आणि या पिकाची सुद्धा नासाडी वर्तवण्यात आली आहे.

तीळाला तेजी
तीळ हे तेलवा नसून तेलवर्गीय पीक असून त्याचे भाव तेजीत राहतील भादली हे पिक रोगराईचे प्रतीक आहे ह्या वर्षात रोगराईचे प्रमाण अधिक असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.

तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा पीक चांगले
बाजरीचे पीक चांगले राहील मटकी पण साधारण राहील साडी म्हणजे तांदळाचे पीक चांगले असेल. लाख हे पिक सर्वसाधारण असेल तर वाटाणा सुद्धा सर्वसाधारण नसेल गहू हरभऱ्याचे पीक ह्या वर्षात चांगले राहणार असून करडीचे पीक सुद्ध चांगले राहणार आहेत कोरडी हे पीक देशाच्या संरक्षणाचे भाकीत वर्तवता संरक्षण खात्यावर जास्त तान संभवतो मसूर हे पिक परकीय घुसखोरी चे द्योतक असून घुसखोरी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहेत साधारण अशाप्रकारे यावर्षी पीक पाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • राजा कायम पण तणावात 
  • रोगराईचे थैमान 
  • घुसखोरी सुरूच राहणार 
  • पाऊस चांगला-अतिवृष्टी पुराने नासाडी
  • तूर पीकएकदम चांगले तर कपाशी सर्वसाधारण
  • देशवासीयांनी संघटित राहण्याची गरज

साडेतीनशे वर्षांची परंपरा
साडेतीनशे वर्षापासून निरंतर सुरु असलेल्या या प्रथेला खंड पडू नये म्हणून पोलीस प्रशासन यांची परवानगी घेऊन काही व्यक्तींच्या उपस्थितीत ही मांडणी करण्यात आली. या वेळी प्रशासनाने व पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल संताजी महाराजांचे सहकारी सारंगधर महाराज वाघ यांनी आभार मानले. आरोग्य विभाग, शासकीय कर्मचारी, पोलीस विभाग अहोरात्र आपल्यासाठी झटत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी बाहेर न निघता सोशल डिस्टन्सची मर्यादा पाळून घरातच थांबण्याची आज गरज आहे. सर्वांनी घरातच थांबून पोलिस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी पुंजाजी महाराजांचे सहकारी सारंगधर महाराज वाघ यांनी आवर्जून केले.