

Buldhana News
sakal
मोताळा : दोन जणांच्या सततच्या त्रासाला कंटाळून ५० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना वडगाव खंडोपंत शिवारात मंगळवारी (ता. १८) उघडकीस आली. रविंद्र संताजी शेळके - पाटील (रा. वडगाव खंडोपंत ह. मु. फुली) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.