

Buldhana News
esakal
बुलडाणा: जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता सन २०२५-२६ या वर्षासाठी पाणीटंचाई निवारणार्थ स्त्रोत बळकटीकरण अंतर्गत रिचार्ज शाफ्ट उपाययोजनांना जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील २० गावांमध्ये एकूण १२७ रिचार्ज शाफ्ट कामांसाठी १ कोटी ५ लाख ३१ हजार १६८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.