"हायटेंशन लाइन'खालील घरांवर बुलडोझर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

नागपूर : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेने हायटेंशन लाइनखालील घरांवर आज बुलडोझर फिरवला. आशीनगर झोनमधील 13 घरांचे बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई आणखी तीन दिवस सुरू राहणार असल्याने संपूर्ण कॉलनीतील 18 घरांवर हातोडा चालविला जाणार आहे.

शहरात हायटेंशन लाइनखाली 3284 घरे आहेत. काही दिवसांपूर्वी हायटेंशन लाइनमुळे जुळ्या भावांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने स्वतः याचिका दाखल करून घेतली होती. यावर काल, उच्च न्यायालयाने घरे पाडण्याचे आदेश दिले होते. आज सकाळी महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक सुगतनगर येथील आरमोर्स टाऊनशिप येथे पोहोचले. हायटेंशन लाइन लगतचे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. सायंकाळपर्यंत 13 घरांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. सर्वच घरमालकांनी गॅलरी बांधल्या होत्या. येथे 18 घरे असून उर्वरित तीन घरांवर पुढील तीन दिवसांत कारवाई केली जाणार आहे. महाल येथेही अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविण्यात आला. धंतोली झोनमधील मेडिकल चौक, राजा बाक्षा, जाटतरोडी, रामबाग रोडवरील जीर्ण घरेही पाडण्याची कारवाई करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buldozer on houses under the "Hi tension Line."