

आरमोरी : शहरातील मुख्य मार्गावर ३० नोव्हेंबरच्या रात्री सहा दुकाने फोडून हजारोंचा मुद्देमाल लांबविल्याची घटना ताजी असतानाच बुधवार (ता. ४) रात्री एका सराफा दुकानाच्या भिंतीला दोन छिद्र पाडून चोरांनी दागिने व इतर साहित्य चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली.