

Tank Tower Accident
sakal
नागपूर : सकाळी दोन घासांसाठी घराबाहेर पडलेले हात संध्याकाळी परतलेच नाहीत. बुटीबोरी एमआयडीसीतील अवाडा कंपनीत कोसळलेल्या टँक टॉवरमुळे सहा कामगारांचे जीव गेले अन् सहा कुटुंबांचे भविष्यही मलब्याखाली गाडले गेले. एका क्षणात कामाची जागा शापित झाली आणि उद्योगाच्या सावलीत जगणाऱ्या मजुरांच्या वेदना उफाळून आल्या. या घटनेने कंपनीची व सरकारच्या कामगार धोरणाची लक्तरे चव्हाट्यावर आणली.