शेतकरी पुत्र पहिल्याच प्रयत्नात झाला सीए

नितीन कुरई
रविवार, 26 ऑगस्ट 2018

बुटीबोरी - मुलाने चांगले शिक्षण घ्यावे यासाठी अविरत मेहनत घेत असलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न साकार झाले आहे. केवल २१ व्या वर्षी बुटीबोरीच्या ओमप्रकाश चरडे याने पहिल्याच प्रयत्नात सीएची कठीण परीक्षा पास करून वडिलांचा सन्मान वाढविला आहे. 

बुटीबोरी - मुलाने चांगले शिक्षण घ्यावे यासाठी अविरत मेहनत घेत असलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न साकार झाले आहे. केवल २१ व्या वर्षी बुटीबोरीच्या ओमप्रकाश चरडे याने पहिल्याच प्रयत्नात सीएची कठीण परीक्षा पास करून वडिलांचा सन्मान वाढविला आहे. 

‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’द्वारे २० जुलै रोजी घोषित झालेल्या निकालांमध्ये देशभरातून केवळ १२१५ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यात बुटीबोरी येथील ओमप्रकाश चरडे याचादेखील समावेश आहे. वॉर्ड क्रमांक ३ नवीन वसाहत येथील सुरेश चरडे हे पारंपरिक शेती व्यवसाय करतात. या शेतीवर मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसाबसा ते चालवि ीआहेत. ओमप्रकाशने सीएसाठी दाखला घेतला. मुलाच्या आत्मविश्‍वासाला तडा न जाऊ देता त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. वडिलांनी मुलगा सीए व्हावा एवढेच स्वप्न पाहिले होते. त्याचे स्वप्न साकार झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर सकाळशी बोलताना झळकत होते. माझ्या मुलाने केवळ माझे नाव नव्हे तर संपूर्ण गावाचे नाव मोठे केले आहे, असेही सुरेश चरडे यांनी सांगितले. 

ओमप्रकाशने जून २०१४ मध्ये सीपीटी २०१५ मध्ये आयपीसीसी व २०१५ ते २०१८ या कालावधीत आर्टिकल्स पूर्ण केले. सीए पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव नुकताच नागपूर येथील चिटणवीस सेंटर येथे पार पडला. पोलिस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ओमप्रकाश सुरेश चरडे यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: CA Omprakash Charade Success Motivation