कार्यकर्ते म्हणतात ‘पार्सल हटाओ’

zp election.jpg
zp election.jpg

अकोला : जिल्हा परिषद-पंचायत समितींच्या निवडणुकीत भारिप-बमसंने तब्बल १८ उमेदवार सर्कल बाहेरील (पार्सल) दिले आहेत. संबंधित पार्सल उमेदवारांचा सर्कलमध्ये जनसंपर्क नसल्यामुळे तिकीट नाकारण्यात आलेल्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदारांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे भारिच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीचा धसका घेतला असून बंडोबांना थंड करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. सदर समितीचे सदस्य उमेदवारांची मनधरणी करेल.

जिल्हा परिषद-पंचायत समितींच्या निवडणुकीत भारिप-बमसंमध्ये तिकीट वाटपावरून असंतोष आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्कल (मतदारसंघ/गट) बाहेरील व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्यामुळे तिकीटासाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते नाराज आहेत. दूसरीकडे नाराज उमेदवार बैठकींच्या माध्यमातून पार्सल हटाओचा नारा बुलंद करत आहेत. विविध बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्ते पार्सल उमेदवारांना हटवण्याची मागणी पक्षातील नेत्यांकडे करत आहेत.

काही ठिकाणी तर बंडखोर उमेदवार उमेदवारी मागे घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. बंडखोरांच्या या भूमिकेचा भारिपच्या पक्षश्रेष्ठींनी धसका घेतला असून बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हास्तरावर तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. सदर समिती पक्षातील अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांसोबत चर्चा करुन बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करेल.

ॲड. आंबेडकरांचा संदेश सांगणार समिती
जिल्हा परिषद-पंचातय समिती निवडणुकीत बंडोबांना थंड करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीमध्ये जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, दामोदर जगताप यांचा समावेश आहे. सदर समिति पक्षाचे कार्यकर्ते, अपक्ष उमेदवार यांना पक्षाची भूमिका सांगणे, त्यांना पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यास सांगेल. याव्यतिरीक्त वंचितचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिलेला संदेश बंडखोरांपर्यत पोहचवण्याचे काम करेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com