आसाम, आंध्रा प्रदेशातून गांजा तस्करी; महिलांच्या खांद्यावर धुरा

Ganja
Ganja

यवतमाळ : गांजाचे वाढते सेवन तरुणांसाठी घातक ठरत आहे. अल्पवयीन मुले गांजाच्या व्यसनात चांगलीच अडकत चालली आहे. आसाम, आंध्राप्रदेशातून गांजा तस्करीला पाठबळ मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तस्करीची धुरा महिलांच्या खांद्यावर दिली आहे. आलिशान वाहनातून गांजाची खेप सुरक्षित पोहोचवली जात आहे.

काही वर्षांत खून, हाणामारी, लुटमार आदी प्रमुख गुन्ह्यात अल्पवयीन मुले अडकत चालली आहे. विधीसंघर्षग्रस्त बालक व्यसनाच्या आहारी गेली आहेत. त्यातूनच गुन्हा करायला त्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. गुन्ह्यात विधीसंघर्षग्रस्त बालकाचा वापर केल्यास त्याच्यावर कडक कारवाई होत नसल्याच्या समजुतीतून गुन्हेगारी वर्तुळातील म्होरक्यांनी अल्पवयीन मुलांना गळी उतरविले आहेत. त्यांना नशेची सवय लावली. त्यातून ही मुले गुन्हे करण्यास प्रवृत्त होतात. याशिवाय यवतमाळ शहरात तर मोकळ्या असलेल्या मैदानातून रात्र होताच गांजाचा धूर निघायला सुरुवात होते.

Ganja
‘मी त्याला मागून लाथ मारली होती’; गडकरींचा व्हिडिओ व्हायरल

अवघ्या काही रुपयांत पुडीत गांजा विक्री केला जातो. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात गांजा विक्रेत्यांचे मोठे नेटवर्क असले तरी ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यासाठी विविध कारणे सांगितली जातात. गेल्या आठवड्यात नेर तालुक्यात गांजा तस्करीची धाडसी कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या जाळ्यात अडकलेली महिला तब्बल वीस वर्षांपासून गांजा तस्करीच्या व्यवसायात होती. ही तस्करी करताना ती आलिशान वाहनाचा वापर करीत होती. गांजा तस्करीत सुंदर महिलांच्या खांद्यावर तस्करीची धुरा देण्यात आली आहे. आलिशान वाहनात एखादी महिला असली की, पोलिसांना तस्करीचा संशय येत नाही. नेहमी हीच कमजोर बाजू तस्करांनी हेरल्याचे बोलले जात आहे.

नक्षलग्रस्त भागातून हलतात सूत्रे

आसाम, आंध्रा प्रदेशातील नक्षलग्रस्त भागातून गांजा तस्करीची सूत्रे हलविली जात आहेत. याबाबत पोलिसांनादेखील माहिती आहे. मात्र, नक्षलगस्त भागात जाऊन कारवाई करणे अडचणीचे आहे. त्यातही तेथील पोलिसांचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे गांजा तस्करीचा पर्दाफाश करणे शक्य होत नाही.

Ganja
विदर्भातील कापसाच्या क्षेत्रात वाढ; या उलट राज्यात सहा टक्के घट

शहराबाहेर उतरते खेप

आलिशान वाहनातून लाखो रूपये किमतीचा गांजा सुरक्षित आणल्यावर त्याची खेप शहराबाहेर असलेल्या शेतशिवारात उतरविली जाते. तेथून गांजाची विल्हेवाट विक्रेत्यांकडे लावली जाते. गेल्या काही वर्षांपूर्वी खात्यातील एका कर्मचार्‍याचे वाहनदेखील गांजा तस्करीसाठी वापरल्या जात असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com