सावधान! कुत्र्यांपासून होऊ शकतो आजार

मंगेश गोमासे ः सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर : माणसाच्या सवयी आणि "फास्टफूड कल्चर'चा फटका आता कुत्र्यांच्याही आरोग्याला बसू लागला आहे.
पावसाळ्यातील दूषित पाणी तसेच जंकफूडच्या ठेल्याजवळ फेकण्यात येणाऱ्या नासक्‍या अन्नामुळे कुत्र्यांना "डिहायड्रेशन' होऊ लागला आहे. त्यामुळे मनुष्याचेही आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नागपूर : माणसाच्या सवयी आणि "फास्टफूड कल्चर'चा फटका आता कुत्र्यांच्याही आरोग्याला बसू लागला आहे.
पावसाळ्यातील दूषित पाणी तसेच जंकफूडच्या ठेल्याजवळ फेकण्यात येणाऱ्या नासक्‍या अन्नामुळे कुत्र्यांना "डिहायड्रेशन' होऊ लागला आहे. त्यामुळे मनुष्याचेही आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
शहरात ठिकठिकाणी जंकफूडची दुकाने लागलेली दिसून येतात. या दुकानांजवळ कुत्र्यांची गर्दी दिसून येते. शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या तब्बल 85 हजारांहून जास्त आहे. दुकानातून निघणारे वाया जाणारे अन्न अन्न नष्ट करण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याने हे अन्न रस्त्यावर टाकून देण्यात येते. त्यावर ही कुत्रे ताव मारताना दिसतात. अनेकदा हे अन्न खराब झाले असल्याने कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात "डिहाड्रेशन'ची समस्या वाढताना दिसून येते. विशेष म्हणजे "डिहायड्रेशन' होताना शरीरात "कोराना' आणि "पार्गो' या "व्हायरस'चा प्रादुर्भाव वाढतो. कुत्र्यांमध्ये या "व्हायरस'चा प्रादुर्भाव वाढल्यास हागवण आणि उलट्यांचे प्रमाण वाढते. कुत्र्यांमध्ये हा आजार वाढल्यानंतर मनुष्य कुत्र्यांच्या संपर्कात येताच, माणसांवर त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता बळावते, असे पशुवैद्यक सांगतात.
कुत्र्यांमधील "डिहायड्रेशन' कळून येत नाही. नासक्‍या अन्नामुळे ते होत असते. पावसाळ्यात हा आजार मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये वाढतो. "झुनॉटिक बॅक्‍टेरिया'मुळे माणसांवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते.
-डॉ. शिरीष उपाध्याय, पशुवैद्यक
मोकाट कुत्र्यांवर प्रतिबंध ठेवण्यासाठी महापालिकेकडून बऱ्याच उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यात कुत्र्यांची नसबंदी आणि त्यांना "ऍटी रेबीज व्हॅक्‍सिनेशन' करण्यात येत आहे. फेब्रुवारीपासूनच हे अभियान महापालिका राबवित आहे.
-डॉ. गजेंद्र महल्ले, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.
मोकाट कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडून मोहीम राबविण्याची गरज आहे. शिवाय त्यावर समाजात जनजागृती करणेही महत्त्वाचे आहे. कुत्र्यांचे पालकत्व स्वीकारल्यास या समस्या सोडविता येणे शक्‍य आहे.
-स्मिता मिरे,
मोकाट कुत्र्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या पशुप्रेमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Careful! Diseases can be caused by dogs