
मलकापूर : रेती वाहतुकीचा व्यवसाय सुरू ठेवण्याकरीता दोन महिन्याचे १६ हजार रूपयांची मागणी करून तडजोडीअंती १४ हजार रूपयांची लाच स्विकारतांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन देवचंद माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोलाच्या पथकाने आज २३ मे रोजी ताब्यात घेत कारवाई केली.