-श्रीकांत पेशट्टीवार
चंद्रपूर : ‘हर घर जल’चा नारा देत केंद्र शासनाने जलजीवन मिशनचा उपक्रम हाती घेतला. महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली. प्रकल्पाच्या कामांना सुरवात झाल्यानंतर भरघोस निधी देण्यात आला. त्यामुळे सुरुवातीपासूनच कामांनी वेग पकडला. आता अनेक कामे पूर्ण होण्याच्या स्थितीत असतानाच केंद्र शासनाने निधीच देणे बंद केले आहे. जवळपास वर्षभरापासून केंद्राचा निधीच मिळत नसल्याने जलजीवन मिशनची राज्यभरातील कामे अर्धवट स्थितीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १३३५ नळयोजनांची कामे घेण्यात आली. त्यातील अनेक कामे अर्धवट स्थितीत असल्याची माहिती आहे.