प्रधानमंत्री स्वनिधी योजनेकडे फेरीवाल्यांची पाठ

feriwalaferiwalaferiwala
feriwalaferiwalaferiwala
Updated on

अमरावती : फेरीवाल्यांना व्यवसायासाठी कर्जाऊ मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेला राज्यात अल्प प्रतिसाद मिळत आहे. राज्यात आतापर्यंत केवळ 10 टक्के फेरीवाल्यांनी या योजनेंतर्गत कर्ज घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यासाठी सरकारकडून दबाव येत असला तरी बहुतांश फेरीवाल्यांनी आम्हाला कर्ज नको, अशी भूमिका घेत या योजनेचा लाभ नाकारल्याचे वास्तव आहे.

राज्यातील महापालिका क्षेत्रातील प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थ्यांची आकडेवारी समोर आली असून त्यानुसार 27 महापालिका क्षेत्रातील 2 लाख 63 हजार 689 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. केंद्राने 5 लाख 770 इतके लक्ष्यांक दिले होते. त्यापैकी निम्म्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील 1 लाख 8 हजार 542 फेरीवाल्यांनी या योजनेअंतर्गत कर्जासाठी महापालिकांकडे अर्ज केले असून 11 हजार 753 लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. एकूण अर्जदारांच्या तुलनेत कर्ज मंजुरीची सरासरी फक्त 10 टक्के आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात लॉकडाउनमुळे फेरीवाल्यांचा व्यवसाय पूर्णतः बंद होता व त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्यात. अनलॉकमध्ये पुन्हा व्यवसाय करता यावा, यासाठी आर्थिक मदत म्हणून केंद्राने दहा हजार रुपये मदतीची कर्जयोजना लागू केली. महापालिकेकडे फेरीवाल्यांनी अर्ज करावे व मनपांनी ती कर्जप्रकरणे बॅंकांकडे पाठवावीत, अशी ही योजना आहे. अनलॉकनंतर फेरीवाल्यांनी व्यवसायाला सुरवात करून कमी भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला. केंद्राच्या या योजनेतील अटींची पूर्तता करून कर्ज घेण्यापेक्षा व्यवसायावर लक्ष केंद्रित करून नुकसान भरून काढण्यावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केल्याने खऱ्या फेरीवाल्यांचे अर्जच महापालिकांना प्राप्त झालेले नाहीत.

ज्यांनी अर्ज केलीत, त्यापैकी बहुतेकांकडे महापालिकेला पथकर भरल्याची पावती नाही, अतिक्रमण विभागाकडून कारवाई केल्याची दंडाची पावती नाही. तो फेरीवाला आहे असे सिद्ध करता येईल, अशी पुरावे नसल्याने त्यांचे अर्ज छाननीत बाद होऊ लागली आहेत.

अमरावती महापालिकेत 57 जणांना कर्ज मंजूर

अमरावती महापालिकेकडे 3432 फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाची नोंद आहे. 7,770 लाभार्थ्यांचा लक्ष्यांक आहे. 3,846 अर्जांची छाननी करण्यात आली असून 6,613 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. आतापर्यंत 475 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून 57 जणांना कर्ज मंजूर झाले आहे. कर्जमंजुरीची सरासरी 11 टक्के आहे. महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही अर्ज केले आहेत, हे विशेष.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com