
बुलडाणा : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज, सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आणि शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचे काम आरोग्य यंत्रणेने प्रामाणिकपणे कराव, असे आवाहन करत कामात कुचराई करणाऱ्यावर कडक करवाई करावी, अशा सूचना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्या.