
अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हापरिषदेत शुक्रवारी (ता.७) मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी एकाच दिवसात ठाण मांडून बसलेल्या तसेच नियमित बदलीसपात्र असलेल्या तब्बल ८० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्यालय बदली आदेश जारी केले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच कार्यलयात व एकाच टेबलवर ठाण मांडून असलेल्यांची बदली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.