सीईओ ऐकणार जनतेची गाऱ्हाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नागपूर : जिल्हा परिषद बरखास्त झाल्याने पदाधिकारी व सदस्य नाही. अधिकारी ऐकत नसल्याच्या समस्या मांडायच्या कुणाकडे, असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. यामुळे सीईओ संजय यादव नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहे. 19 ऑगस्टपासून हा उपक्रम सुरू होणार आहे.

नागपूर : जिल्हा परिषद बरखास्त झाल्याने पदाधिकारी व सदस्य नाही. अधिकारी ऐकत नसल्याच्या समस्या मांडायच्या कुणाकडे, असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. यामुळे सीईओ संजय यादव नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहे. 19 ऑगस्टपासून हा उपक्रम सुरू होणार आहे.
आरक्षणाचा मुद्दा अद्याप निकाली न निघाल्याने नजीकच्या काळात निवडणुका होणे शक्‍य नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या स्थानिक स्तरावरील समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी मिळण्यास बराच अवकाश आहे. परिणामत: आपल्या समस्या मांडणारे किंवा ऐकून घेणारे आता कुणीच नाही, अशी भावना ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये बळावू लागली आहे. सध्या खरिपाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, तर काही ठिकाणी साथीच्या रोगांची भीती वाढली आहे. अशातच सामान्य प्रशासन विभागात फाईली अडकत असल्याच्याही तक्रारी येऊ लागल्या आहेत. या समस्या सोडवून ग्रामीण भागातील कामे मार्गी लावण्याच्या हेतूने सीईओ संजय यादव यांनी हे पाऊल उचलले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना आता आपल्या समस्या थेट यादव यांच्यापुढेच मांडता येणार आहेत. दर सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दीडपर्यंत सीईओ हे त्यांच्या कार्यालयात उपलब्ध राहतील, असे पत्रक कार्यालयासमोर लागले आहे. सोबत अतिरिक्त सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सगळ्या विभागांचे प्रमुखसुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांची समस्या ज्या विभागाशी निगडित असेल त्या विभागाच्या प्रमुखाद्वारे तेथेच समस्येची नोंद घेतली जाईल. अथवा या प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेतले जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The CEO will listen to the people