
अमरावती : ‘‘मातृभाषेतून शिक्षण घेणारे लोकच सध्या जगभरामध्ये विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. केवळ इंग्रजी भाषेतूनच ज्ञान मिळते हा एक गैरसमज सर्वत्र पाहायला मिळतो. भाषेवरून विनाकारण राजकारण करता कामा नये,’’ असे प्रतिपादन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज व्यक्त केले.