देवगिरी चंद्रकांत पाटलांना

नीलेश डोये - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नागपूर - हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेली देवगिरी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हा सस्पेन्स संपला असून, महसूल व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना ती देण्यात आली. देवगिरीमुळे दादांचे वजन वाढले आहे. यावरून त्यांना विधान परिषदेचे नेते केले जाणार आहे.

नागपूर - हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेली देवगिरी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हा सस्पेन्स संपला असून, महसूल व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना ती देण्यात आली. देवगिरीमुळे दादांचे वजन वाढले आहे. यावरून त्यांना विधान परिषदेचे नेते केले जाणार आहे.

युतीची सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नसल्याने पहिल्या अधिवेशनात देवगिरी रिकामी ठेवण्यात आली होती. तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी यासाठी आग्रह धरला होता. मात्र, शेवटपर्यंत त्यांनी ती देण्यात आली नाही. दुसऱ्या अधिवेशनात आजाराचे कारणपुढे करून त्यांनी हट्टाने मिळवून घेतली. घोटाळ्याचे आरोप झाल्याने खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांचे महसूल खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आल्यानंतर देवगिरी न मागताच मिळाली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे रविभवनातील कॉटेज कायम ठेवण्यात आले असून, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दोन नंबरचे कॉटेज काढून सहा नंबरचे देण्यात आले. यामागचे नेमके कारण कळले नसले तरी राजकीय वर्तुळात मात्र मुनगंटीवार यांचे मंत्रिमंडळातील वजन घसरल्याची चर्चा आहे. गुरुवारी कॉटेज वाटपाची बैठक झाली.

देवगिरी कोणालाच नको
विशेष म्हणजे देवगिरीसाठी यावर्षी कोणीच आग्रह धरला नाही. विनंतीही केली नव्हती. चंद्रकांत पाटील ज्येष्ठ सदस्य तसेच महसूलमंत्री असल्याने न मागताच त्यांना देवगिरी देण्यात आली.

मंत्र्यांचे कॉटेज क्रमांक
1 विनोद तावडे
2 प्रकाश मेहता
3 दिवाकर रावते
4 विष्णू सावरा
5 चंद्रशेखर बावनकुळे
6 सुधीर मुनगंटीवार
7 रामदास कदम
8 पांडुरंग फुंडकर
9 पंकजा मुंडे
10 एकनाथ शिंदे
11 सुभाष देशमुख
12 गिरीश बापट
13 रिक्त (झोटिंग समिती)
14 गिरीश महाजन
15 बबनराव लोणीकर
16 दीपक सावंत
17 हरीभाऊ बागडे
18 रामराजे निंबाळकर
20 माणिकराव ठाकरे
21 राजकुमार बडोले
22 धनंजय मुंडे
23 राधाकृष्ण विखे पाटील
24 राम शिंदे
25 सुभाष देशमुख
26 जयकुमार रावल
27 संभाजी पाटील

Web Title: chandrakant patil devgiri