Chandrapur: बोर नावाचे प्राचीन गाव सापडले, इतिहास अभ्यासकांचा दावा; पाषाणयुगीन वस्ती, सातवाहन ते यादव काळ
Discovery of Ancient Bor Village in Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील इरई आणि झरपट नदीच्या संगमाजवळ ‘बोर’ नावाचे प्राचीन व नष्ट झालेले गाव सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
चंद्रपूर: इरई आणि झरपट नदीच्या संगमाजवळ पूर क्षेत्राबाहेर प्राचीन गावाचे संशोधन करताना बोर नावाचे एक नष्ट झालेले गाष संशोधकांना आढळले आहे. नदी संगमाजवळ हे गाव आढळल्याचा दावा अभ्यासक आणि संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांना केला आहे.