
चंद्रपूर -संवाद प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने दिल्या जाणा-या स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार- 2025’ च्या पुरस्कारांची घोषणा आज सोमवारला करण्यात आली. येत्या २३ फेब्रुवारी रोजी स्थानिक इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात विदर्भ स्तरीय हिरकणी सांस्कृतिक महोत्सवात सकाळी दहा वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत वासाडे आणि सचिव विजय बदखल यांनी पत्रकार परिषदेत दिली.