चंद्रपूर: नवजात बालकांच्या विक्रीचे रॅकेट चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात दोन बालकांची विक्री झाली., तिसऱ्या नवजात बालकाची विक्री करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला..या प्रकरणात बालकांची आई तसेच बालकांना दत्तक घेणाऱ्या तेलंगणा आणि चंद्रपूर येथील दोनमहिलांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय फुलझेले हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. तसेच बालकांच्या विक्रीत सहभागी असल्याचा संशय असलेल्या दोन दलालांची ओळख पटली असून पोलिस त्यांचा मागोवा घेत आहेत..Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य.रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती ऐकुरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिची ओळख अजय फुलझेले याच्याशी झाली आणि दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. संबंधित महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी केली असता दोन नवजात बालकांची सुमारे दोन लाख रुपयांत विक्री केल्याची माहिती समोर आली. तसेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात.बालकाच्या विक्रीचाही व्यवहार ठरला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने हा व्यवहार होण्यापूर्वीच उघळण्यात आला. या प्रकरणात तेलंगणातील कागजनगर येथील एका महिलेसह चंद्रपूर शहरातील एका महिलेला अटक करण्यात आली आहे. विक्री झाल्याचे सांगितले जाणारे बालक सुरक्षित असून त्यांना 'किलबिल' संस्थेत ठेवण्यात आले आहे..दरम्यान, बालकांच्या विक्रीसाठी मध्यस्थी करणारे दोन दलाल चंद्रपूर शहरातील असल्याचा पोलिसांना संशय आहे. या दोघांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. मुख्य आरोपी अजय फुलझेले आणि दोन्ही संशयित दलाल अद्याप फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत..असं काय घडलं की, नाटक सुरु असताना स्वप्नील जोशीचं मध्येच थांबवलं, म्हणाला...'सॉरी पण...'.प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचारअजय फुलझेले याने प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. ही बाब लपविण्यासाठी मुलीला प्रसूतीसाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मुलीचे वय चुकीचे सांगण्यात आले. आहे. मात्र डॉक्टरांना संशय आल्याने प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. नागपूरच्या अजनी पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून प्रकरण चंद्रपूर पोलिसांकडे वर्ग केले. त्यानंतर रामनगर पोलिसांनी ल तपास सुरू केला. चौकशीदरम्यान हे प्रकरण नवजात बालकांच्या विक्रीशी संबंधित असल्याचे समोर आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.