Chandrapur Irrigation : धडक सिंचन विहिरींना महागाईची झळ पाच वर्षांपूर्वीची योजना; केवळ अडीच लाख निधी, लाभार्थ्यांनी फिरविली पाठ
Water Management : राज्य शासनाने धडक सिंचन कार्यक्रम हाती घेतला. २०१९ मध्ये या कार्यक्रमाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. मात्र, त्यानंतर विविध कारणाने हा कार्यक्रम मागे पडला. आता महागाईत या विहिरी होणे कठीण झाले आहे.
चंद्रपूर : सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी राज्य शासनाने २०१९ मध्ये धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम हाती घेतला. कोरोना आणि विविध कारणांमुळे ही योजना अद्याप पूर्ण झाली नाही. विहिर बांधकामासाठी केवळ अडीच लाख रुपयांचा निधी मिळतो.