

Chandrapur
esakal
चंद्रपूर: समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात काळाच्या पडद्याआड गेलेल्या जीवने कुटुंबातील पाच सदस्यांना सोमवारी (ता. २९) चंद्रपुरात शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. शांतीधाम स्मशानभूमीत एकाच चितेवर पाचही पार्थिवांवर अंत्यसंस्कार होताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग उपस्थित सर्वांना हेलावून गेला.