Chandrapur Kidney Selling Case Takes Shocking Turn
esakal
चंद्रपूर, ता. २९ – कर्जाच्या जाचातून एका शेतकऱ्याने कंबोडियात किडनी विकल्याच्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत धक्कादायक टप्प्यावर पोहोचण्याच्या मार्गावर आहे. या प्रकरणात विशेष तपास पथकाच्या हाती एक ‘बडा मासा’ लागला असून त्याला घेऊन तपास पथक आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास चंद्रपुरात दाखल होणार आहे. या अटकेनंतर देशांतर्गत किडनी तस्करीचे मोठे आणि संघटित रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अटकेतील हा ‘बडा मासा’ वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असून देशभर पसरलेल्या किडनी रॅकेटचा तो प्रमुख सूत्रधार असल्याचे संकेत तपासात मिळाले आहे.