Kidney Trafficking: आणखी तिघांची किडनी काढली; मानवी अवयव तस्करीच्या रॅकेटचा देशभर विस्तार, पोलिस डॉक्टरच्या मागावर
Chandrapur Kidney Trafficking Case Explained: कर्जबाजारीपणातून कंबोडियात जाऊन किडनी विकण्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये उघड झाला असून, देशभर सक्रिय असलेल्या मानवी अवयव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे गंभीर स्वरूप समोर आले आहे.
चंद्रपूर : सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकणाऱ्या रोशन कुडे प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुडे यांच्यासोबत उत्तरप्रदेशसह इतर दोन राज्यांतील आणखी पाच युवक कंबोडियात जाण्यासाठी निघाले होते.