Kidney Trafficking Racket: चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली असून बांगलादेशातील तरुणांचाही यात समावेश उघड झाला आहे. कंबोडियात मानवी अवयव तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा संशय; विशेष तपास पथकाकडून चौकशी वेगात.
चंद्रपूर : चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणाची व्याप्ती आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असून, अनेक राज्यांसह बांगलादेशमधील युवकांनीही कंबोडियात किडनी विकल्याचे ‘सकाळ’ने समोर आणल्यानंतर यंत्रणा हादरली आहे.