Chandrapur : बैलबंडी घेऊन शेततळ्यात उतरला अन बुडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrapur farmer news

Chandrapur : बैलबंडी घेऊन शेततळ्यात उतरला अन बुडला

गोंडपिपरी : जनावरांना पाणी पाजण्यासाठी बैलबंडी घेऊन शेततळ्यात उतरलेला पाण्यात बुडला या घटनेत एका बैलाचा व गाईचा मृत्यू झाला.डुबलेल्या इसमाचा अद्यापही पत्ता लागला नाही.आज सकाळी हि घटना गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर गावात घडली.धानापूर येथे माधव लडके यांच्या शेतात शेततळे आहे.सध्या पावसाने शेततळे फुल्ल भरून आहे.

हेही वाचा: Chandrapur : गोजोलीच्या शेतक-याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

या शेततळ्यात बैलांना पाणी पाजण्यासाठी गावातील भाष्कर साळवे हा थेट बैलबंडी घेऊन शेततळ्यात उतरला.काही अंतरवर जाताच बैलबंडी फसली व साळवे पाण्यात डूबले.या घटनेत एका बैलाचा व गाईचा मृत्यू झाला आहे.भाष्कर सावळे यांचा शोध घेणे सूरू आहे.याकरिता चंद्रपूरवरून पथक बोलविण्यात आले आहे.धानापुर येथे घडलेल्या घटनेची माहिती कळताच गावकर्यांनी एकच गर्दी केली.