

Chandrapur Lightning Strike Deaths Two Killed Eight Injured In Separate Incidents At Mul Pombhurna And Bramhapuri Villages Today
sakal
चंद्रपूर: जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघे ठार, तर आठ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. १७) ब्रह्मपुरी तालुक्यातील बरडकिन्ही, मूल तालुक्यातील उसराळा आणि पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना या गावांत घडली. मृतांत दीपक नारायण मडावी (वय ३५ रा. उसराळा, ता. मूल), केशव डोनू गुडी (वय ५५ रा.चेकठाणेवासना ता. पोंभुर्णा) यांचा समावेश आहे.