

Chandrapur
esakal
चंद्रपूर: क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. क्षयरोगाप्रती समाजामध्ये असलेले भेदभाव दूर करणे आणि त्यांना शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, तसेच क्षयरुग्णांना आवश्यक औषधोपचार करून क्षयमुक्त करणे, या उद्देशाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी काल शुक्रवारी क्षयरोग दूरीकरण मोहिमेचा आढावा घेतला. सद्यस्थिातीत जिल्ह्यात एकूण 905 रुग्णांवर योग्यरित्या उपचार सुरू असून ३४५ ग्रामपंचायती टीबी मुक्त झाल्या आहेत.