

Chandrapur Tiger Attack: Four Women Killed During Tendu Leaf Collection in Sindewahi Forest
esakal
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने जीवघेणा हल्ला केला. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या भीषण घटनेत चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.