

Chandrapur
eskala
चंद्रपूर: शहरामध्ये वाढत्या भीषण पाणीटंचाईच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (ता. २) महापालिकेसमोर ‘पाणी हक्क उठाव’ आंदोलन करण्यात आले. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापासून ते महानगरपालिकेपर्यंत शेकडो महिलांची रॅली काढण्यात आली. यावेळी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.