गुरुकुंज मोझरी, (जि. अमरावती) - ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी हा गहन विषय आहे. तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी, याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या शिफारशीच्या अहवालावर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल,’ असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.