esakal | मोदी यांच्या नियोजित सभेच्या स्थळात बदल
sakal

बोलून बातमी शोधा

मोदी यांच्या नियोजित सभेच्या स्थळात बदल

मोदी यांच्या नियोजित सभेच्या स्थळात बदल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : दररोज येणाऱ्या पावसाचा धसका घेत प्रशासनाने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित सभेच्या स्थळात बदल केला. आता कस्तुरचंद पार्कऐवजी मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात पंतप्रधानांची सभा होणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान दुसऱ्यांदा क्रीडासंकुलात येणार आहे. यापूर्वी ते 14 एप्रिल 2017 ला पंतप्रधानांची क्रीडासंकुलात सभा झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 सप्टेंबरला हिंगणा मार्गावरील मेट्रोच्या प्रवासी सेवेला हिरवी झेंडी दाखविणार आहे. ते सुभाषनगर स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवासाचा आनंद लुटणार आहे. यानंतर ते सभेला मार्गदर्शन करणार आहेत. कस्तुरचंद पार्क येथे सभेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दररोज पावसाच्या हजेरीमुळे कस्तुरचंद पार्कवर चिखलाचे साम्राज्य आहे. याशिवाय या आठवड्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे प्रशासनाने सभेचे स्थळ बदलले. आता पंतप्रधानांची सभा मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यापूर्वी 14 एप्रिल 2017 ला क्रीडासंकुलात सभा झाली होती. त्यांनी येथेच "भीम ऍप'चे लोकार्पण केले होते. त्यावेळी त्यांनी क्रीडासंकुलातून तरुणांना "कॅशलेस' होण्याची साद घातली होती. आता ते मेट्रोच्या लोकार्पणासोबत महापालिकेच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पणही करणार आहे. त्यामुळे ते काय बोलणार? याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
loading image
go to top