- मुनेश्वर कुकडे
गोंदिया - एकेकाळी जीवनदायिनी म्हणून ओळख असलेल्या पांगोली नदीची ही ओळख पुसली गेली आहे. याला कारणीभूत इथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेचे नदीच्या पुनरुज्जीवनाकडे झालेले दुर्लक्ष हेच आहे. अवतीभवती असलेल्या कारखान्यांमधील रसायनयुक्त पाणी या जीवदायिनीच्या पोटात गेले आहे. या पाण्यामुळे शेकडो एकरवरील शेतजमीन नापिक झाली आहे.