

Buldhana News
esakal
बुलडाणा: बुलडाणा शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती दरवर्षी आज (ता.१४) रोजी अत्यंत भव्य आणि उत्साहात साजरी केली जाते.यावर्षी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली (ता.१३) मे पासून विविध उपक्रम सुरूवात झाली असून आज गुरुवार (ता. १४) रोजी मुख्य सोहळा, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, जयस्तंभ चौक येथे जन्मोत्सव सोहळा व भव्य पाळणा कार्यक्रम आयोजित केली आहे. शुक्रवार (ता.१५) रोजी स्थानिक शिवस्मारक, संगम चौकातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.